कींन्ही गावात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ….सात जणांना तोडले लचके

0
3

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

… सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे सकाळी आठ ते दहाच्या वेळात तीन पिसाळलेल्या कुत्र्यानी गावात व शेतीशिवारात धुमाकुळ घालीत सात जणांना कडकडुन चावा घेत जखमी केल्याची घटना घडली जखमीमधील दोन जणांना औरंगाबाद घाटीत तर एकास चाळीसगाव इतर बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सद्या कीन्ही गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे.


.सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत ह्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ चालुच होता गावात ही पिसाळलेली कुत्रे घुसताच गल्ली बोळात आरडाओरडा सुरु झाला तो पर्यत ह्या कुत्र्यानी कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला कडकडुन चावा घेत गंभीर जखमी केले जखमींमध्ये गंगाराम शेलार (वय ४५)आशाबाई उत्तम वाडेकर (वय ३८) आशाबाई विष्णु मगर (वय ३२) राहुल दगडु चव्हाण (वय १७ )यश विलास फलके (वय ८) नकुल विलास फलके (वय ७) बाळु निकम( वय ४५) असे असुन त्यातील गंगाराम शेलार व आशाबाई मगर यांना औरंगाबाद घाटीत तर राहुल चव्हाण यास चाळीसगाव उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ईतर बनोटी येथे उपचार घेत आहेत.

ह्या पिसाळलेला कुत्र्यांना मारण्यासाठी सरपंच किशोर फलके, सुभाष वाडेकर, सुरेश पवार, दादासाहेब शिंदे,आण्णा वाडेकर,एकनाथ मिस्तरी,आण्णा आगे, राजू बलांडे, भैया फलके, भावडू लोखंडे, ऋतिक दनके, दगडू कोळी, कालु दादा, गणेश सपकाळ, राजू भिवसने, आदींनी काठ्या लाठ्या घेत शर्थीचे प्रयत्न करून पिसाळलेल्या एका कुत्र्याला मारले परंतु इतर दोन पिसाळलेले कुत्रे अद्यापही मोकाट आहेत ह्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here