कासोदा आडगाव रस्त्यावर इंडिका गाडीचा बिषण अपघात : चालक गंभीर जखमी

0
34

कासोदा : आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आडगाव रस्त्यावर कासोददया कडून आडगाव जाणाऱ्या इंडिका गाडी MH-४७-N -२८१७ ला जोरदार अपघात झाला असून गाडी चालक ज्ञानेश्वर राठोड (वय ३५) जखमी झाला असून, चालक चाळीसगाव येथील तालुका पिंपरखेड तांडा येथील राहायला आहे. त्याला १०८ च्या साहाय्याने जळगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
चालक हा गाडी एकटाच होता. गाडीचा वेग जस्त असल्याने ती सरड कासोदा रस्त्यावरील पाटचारी पुढे रमेश पाटील याच्या शेताजवळ गाडी झाडावर जाऊन आदळली.
चालकाला गाडीतून काच फोडून बाहेर काढण्यात आले. त्यासाठी लुनेश्वर भालेराव, यु.टी.महाजन सर, आडगाव ग्रा.पं सदस्य अनिल पाटील (पिंटू मिस्तरी) आडगावचे गोपाल सोनवणे, शुभम पाटील, मंगेश ठाकूर, रवि सोनवणे, गणेश पाटील, नंदू मोहिते इत्यादींनी तात्काळ साहाय्यता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here