कवी अशोक कोळी यांच्या ‘कडीबंदी’ कथासंग्रहास फडतरे स्मृती पारितोषिक

0
16

जळगाव ः प्रतिनिधी

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे फुलाबाई आनंदराव फडतरे स्मृती ग्रंथ पारितोषिक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘कडीबंदी’ या कथासंग्रहास जाहिर झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे विविध वार्षिक ग्रंथ पारितोषिक दिले जातात. त्यापैकी संस्कृती प्रकाशन, पुणे यांचे पुरस्कृत ‘फुलाबाई आनंदराव फडतरे’ पारितोषिक डॉ. कोळी यांच्या कडीबंदी या कथासंग्रहासाठी जाहीर झाले आहे.

येत्या 26 मे रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात प्रसिद्ध हिंदी लेखक अशोक वाजपेयी यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. रावसाहेब कसबे हे भूषवणार आहेत.

‘कडीबंदी’ डॉ. अशोक कौतिक कोळी यांचा पाचवा कथासंग्रह आहे. यातून त्यांनी कोरोना काळातील भयावह भवतालाला कथनरूप दिलेले आहे. सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा यांनी हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे. कूड, सूड, आसूड, उलंगवाडी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. पाडा, कुंधा, दप्तर, रक्ताळलेल्या तुरी, मेटाकुटी ह्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. खास ग्रामीण संवेदन आपल्या अनोख्या शैलीत प्रकटीकरण करण्यात लेखक कोळी यांची विलक्षण हातोटी आहे. ग्रामीण साहित्य कलाकृतीसाठी पारितोषिक जाहिर झाल्याने आपली जबाबदारी आणखी वाढली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here