विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला , यावेळी गावातील महिला बचत गट व गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या , महिला दिनाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ महिला व गावातील महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सरपंच चंदाताई राजपुत व उपसरपंच मनिषाबाई जैस्वाल यांच्या वतीने करण्यात आला , कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले , कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच सौ.चंदाबाई राजपुत, उपसरपंच सौ.मनिषाबाई जैस्वाल व सर्व ग्रा.प.सदस्य ,ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड, मुख्याध्यापक एस.आर.खाकरे , युवासेनेचे कुणाल राजपुत , शाळा समिती अध्यक्ष सारीका हिवराळे , पोलिस पाटील उज्वलाबाई बिंदवाल , बबिता परदेशी , शिल्पा बोराडे , अंगणवाडी सेविका शोभाबाई बिंदवाल , ग्रामरोजगार सेवक प्रताप उबाळे यांनी परिश्रम घेतले व महेश गवादे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले , यावेळी गावातील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.