ओमिक्रॉन पार्श्वभूमीवर सकल लेवा पाटीदार समाजाचा युवक-युवती परिचय संमेलनाचा कार्यक्रम रद्द

0
2

जळगाव, प्रतिनिधी । सध्या देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉन व कोरोना संक्रमण वाढल्याचे निदर्शनास आल्याने , प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातलेले असुन हॉलमधील कार्यक्रमाला आसनक्षमतेच्या 25 टक्के व मोकळ्या जागेवरील कार्यक्रमाला 50% याप्रमाणे मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे .

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, बहीणाई ब्रिगेड व लेवा सखी घे भरारी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २/१/२०२२ वार रविवार रोजी सकाळी 11 वाजता लेवा भवन , जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विवाह ईच्छूक युवक- युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते . सदर परिचय संमेलनास मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून व परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात युवक – युवती त्यांचे पालक यांनी नोंदणी केलेले आहे. त्यामुळे सदर कार्यक्रमाला सुमारे पाच हजार समाजबांधव उपस्थित राहतील अशी शक्यता नाकारता येत नाही .

त्यामुळे प्रशासनाने काढलेल्या कोरोना नियमांची पायमल्ली होऊ नये व जळगाव शहरात भविष्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्यासाठी सदर कार्यक्रमाचे निमित्त होऊ नये. यासाठी खबरदारीचा उपाय करत जळगावकर नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी सदरचा दिनांक २/१/२०२२ रोजीचा जळगाव येथे परिचय संमेलनाचा होणारा कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला आहे . कोरोना नियम शिथिल झाल्यास व प्रशासनाने परवानगी दिल्यास कार्यक्रमाची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल अशी समाज बांधवांनी नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here