जळगाव ः प्रतिनिधी
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शहरातील निसर्गमित्र परिवारातर्फे राज्यव्यापी ऑनलाइन ‘हरित वैज्ञानिक दृष्टीकोन चाचणी’ घेण्यात आली. या चाचणीत ३१६ नागरिक सहभागी झाले. त्यात महाराष्ट्रातील ३०४ अन्य पाच राज्यातील ११ व बहरीन येथील १ असे एकूण ३१६ निसर्गप्रेमी नागरिक सहभागी झाले. त्यात चहार्डी, धुळे, पुणे, नाशिक, मुंबई,कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, गडचिरोलीसह विविध जिल्ह्यातील निसर्गप्रेमींचा समावेश होता.
पर्यावपण चळवळीसंबधी ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक १९६२ साली प्रकाशित झाले.या घटनेतून प्रसार माध्यमांची ताकद व त्यांचे महत्व व माध्यम स्वातंत्र्याची गरज अधोरेखित होते. हे लक्षात घेऊन या विषयावर आधारित दहा प्रश्नांची ‘हरित वैज्ञानिक दृष्टीकोन’ ही चाचणी घेतली.चाचणीतून दिलेल्या उत्तरातून लोकांची भूमिका स्पष्ट झाली. यामध्ये सहभागी निसर्गप्रेमींचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला. विविध पर्यायांतून हरित उत्पादन व्यवस्था हवी, जैवविविधता नष्ट झाल्याने नवनवीन विषाणू जन्माला येत आहेत. मानवाने अन्नसाखळीचा समतोल राखून विकास केला पाहिजे, प्रदूषित शेती नाकारली पाहिजे, चुकीच्या विकासनीतीमुळे हवामान व तापमान बदल होत आहे.
प्रदेशनिष्ठ वनस्पतींची लागवड केली पाहिजे या पर्यायांची निवड ९५ टक्के लोकांनी केली. ‘चला आपली पृथ्वी पुनरुज्जीवित करू’ हा संकल्प या वेळी करण्यात आल्याचे पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले. या चाचणीतून प्रसार माध्यमांची ताकद व त्यांचे महत्व अधोरेखित झाल्याचेही ते म्हणाले. तसेच पर्यावरणाच्या रक्षणाबाबत जनजागृती देखील झाली.