‘एमआरसीपी पॅसेस’ मध्ये डॉ. विपुल चौधरींचे यश

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील गॅस्ट्रोएन्टेरोलाजिस्ट डॉ. विपुल चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय ‘एमआरसीपी पॅसेस’ या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. युरोपमध्येही त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची मान्यता मिळाली.

सेंट जोसेफ हायस्कूल येथे शालेय शिक्षण तर 11वी आणि 12वी पर्यंतचे शिक्षण मूळजी जेठा महाविद्यालयातून घेतले. शालेय दशेत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा, गणित विषयाचीही स्वतंत्र परीक्षा त्यांनी देऊन यश संपादन केले. गणितात विशेष रुची असलेले डॉ. विपुल यांनी इयत्ता आठवीत असतानाच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट बनणार असे स्वप्न उराशी बाळगले होते. आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रातीलच लाभल्याने आणि अत्यंत बुद्धिमानी असलेले डॉ. विपुल यांचा शिक्षणाचा प्रवास सुलभ झाला.फिजिशियन डॉ.सुनिल चौधरी व डेंटिस्ट डॉ. पुष्पा चौधरी यांचे डॉ. विपुल चौधरी हे सुपुत्र आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here