एमआयडीसी परिसरातील तरूणीचा विनयभंग

0
14

जळगाव । एमआयडीसी परिसरात २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकातरुणाविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरातील एका भागात २२ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. घरातील काही सदस्य कंपनीत जावून उदरनिर्वाह करतात. गुरूवारी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास तरूणी आपल्या आईसोबत किरणा माल घेण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी संशयित आरोपी सुभाष आकुलकर (पुर्ण नाव माहित नाही) हा तरूणीजवळ येवून मागील भांडणाचे कारणावरून तरूणीचा हात पकडला. तिला शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल. शिवाय तरूणीच्या आईला देखील मारहाण करून अश्लिल शिवीगाळ केली. तसचे तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

तरूणीने याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी सुभाष आकुलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here