एणगाव येथील सरपंचपती यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल

0
3

बोदवड :  प्रतिनिधी सुहास बारी 

तालुक्यातील एणगाव येथील सरपंच पती विनोद दत्तु कोळी यांच्या विरुद्ध फिर्यादी ग्रामपंचायत सदस्य प्रदिप रघुनाथ तायडे यांनी बोदवड पोलीस ठाणे येथे अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एणगाव गाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रदीप तायडे यांनी ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग बुकाची नक्कला मागितल्या होत्या त्याचाच राग आल्याने सरपंच पती विनोद कोळी यांनी मागासवर्गीय सदस्य प्रदिप तायडे यांना शिवीगाळ करून तसेच खुर्चीने मारहाण केली म्हणाला कि तुला कोणत्याही नक्कला मिळणार नाही,तु जर ग्राम पंचायत मध्ये आला तर तुला मारून टाकले,सदर प्रोसिडिंग ग्रामसेवक व शिपाई यांना सांगुन फाडुन टाकेल व तुझे नाव घेईन व तू माझ्या पत्नीचा हात धरला अशी खोटी तक्रार देईन अशी धमकी दिली,असे फिर्यादी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे,व भा.द.सं कलम ५०४,५०६ अंतर्गत कोळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here