जळगाव : प्रतिनिधी
बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनतर्फे उद्या रविवार रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरेाग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर सकाळी 11 ते 1 या वेळात ज्ञान साधना शाळा (हुडको), पिंप्राळा जळगाव येथे होणार आहे.
या आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार करतील तर प्रमुख पाहुणे म्हणुन काँग्रेसचे जामनेर तालुकाध्यक्ष शरद पाटील यांची उपस्थीती लाभणार आहे.
शिबिरात स्री रोग तज्ज्ञामार्फत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येईल.तसेच मूळव्याध तज्ज्ञ डॉ मनोज पाटील हे मूळव्याध, फिशर, भगंदर व इतर संबंधित आजारांवर तपासणी व उपचार करतील.
मूळव्याध शत्रक्रिया, मोती बिंदू शत्रक्रिया विनामूल्य करण्यात येईल. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निखील चौधरी, दंतरोग तज्ज्ञ डॉ. सुयोग सोमाणी हे शिबिरात तपासणी करतील. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी अगोदर नाव नोंदणी करावी अधिक माहितीसाठी निळकंठ वाणी (87931 32815) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडशन च्या अध्यक्षा सुधाताई काबरा यांनी केले आहे.