आ. शिरीषदादांनी संकटमोचक उल्लेख करून राजकीय उद्दिष्ट स्पष्ट करीत दिल्या शुभेच्छा

0
3

यावल : प्रतिनिधी 
राजकारणात,समाजात, व्यवसायिक क्षेत्रात स्पर्धा ही निकोप असावी हरकत नाही,वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण काम करताना तुझ्या पेक्षा माझी रेषा लांब कशी मोठी होईल हा प्रयत्न केला तर त्याला हरकत असायचं कारण नाही,चांगल्या उपक्रमाचे स्वागत केले पाहिजे,तर शेवटी आमचा सर्वांचा उद्देश जनतेची सेवा करणे हा आहे,स्वार्थ साध्य करणे हा नाही आणि जो पर्यंत आम्ही स्वार्थाच्या मागे लागणार नाही तोपर्यंत जनतादेखील आमच्या सगळ्यांच्या सोबत राहील असा मला विश्वास आहे,आणि जनहिताची चांगले कामे करताना काही अडचण आली तर (व्यासपीठावर उपस्थित माजी जलसंपदामंत्री तथा आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे बघून)आमचे “संकट मोचक”आहेतच काही चिंता करण्याचे कारण नाही, गिरीशभाऊंनी हात वर केले की भले भले लोक खाली येतात त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.(असे म्हणत मागील एका विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता मित्र पक्षा पेक्षा भाजपशी जवळीक साधण्याचे  मनातील राजकीय उद्दिष्ट आमदार शिरीषदादांनी स्पष्ट केले.

यावल येथील भुसावल रोडवरील बोरोलेनगर येथे रविवार जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते, जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन, खासदार  रक्षाताई खडसे, आमदार राजूमामा भोळे, आमदार शिरीषदादा चौधरी, माजी मंत्री आमदार संजयभाऊ सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, तालुका सरचिटणीस उज्जनसिंग राजपूत,  भाजपा किसान मोर्चा संयोजक सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन,पद्माकर महाजन, कांचनताई फालक, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, पंचायत समिती माजी सभापती पल्लवीताई चौधरी, डांभुर्णी ग्रामपंचायत माजी सरपंच पुरुजीत चौधरी, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, कृषी मित्र हरिभाऊ जावळे फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल जावळे, नरेंद्र नारखेडे, भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष नारायण बापू चौधरी, भाजपा यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, पंचायत समिती माजी उपसभापती दीपक पाटील, तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांच्यासह तालुक्यातील सर्व स्तरातील पदाधिकारी,कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आई हॉस्पिटलचे संचालक डॉ. कुंदन फेगडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून आपल्या वैद्यकीय कामासह सामाजिक कार्याची माहिती दिली की,श्री महर्षी व्यास यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या व्यास नगरीत आई हॉस्पिटलच्या माध्यमातून गत 15 वर्षांपासून स्त्री रुग्ण सेवा यशस्वीपणे सुरु आहे.जनता जनार्दनाच्या शुभेच्छा व आशीर्वादाने आम्हाला रुग्णसेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली.तथापि या ग्रामीण, आदिवासी व उपेक्षित परिसरात अजूनही पुरेशा वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवते, रुग्णांची ही खरी गरज ओळखून या पुढचे पाऊल म्हणून आम्ही यावल शहरात जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नूतन व अत्याधुनिक वास्तूद्वारा विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा व सेवा उपलब्ध करुन देण्याचा शुभारंभ करीत आहोत.
माजी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले, खासदार रक्षाताई खडसे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले आपले मनोगत व्यक्त करून हॉस्पिटल उद्घाटन व विविध सेवा उपलब्ध होणार असल्याने शुभेच्छा दिल्या.उद्घाटन कार्यक्रम अनेकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालालभाऊ चौधरी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी यावल तालुक्यातील,शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी व तरुणांनी परिश्रम घेतले.

जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुढील प्रमाणे उपलब्ध राहणार आहेत. उपलब्ध सेवा-दोन सुसज्ज ऑपरेशन थिएटर,सुसज्ज सर्जिकल अतिदक्षता विभाग(आय.सी.यु.), मल्टी पॅरा मॉनिटर, कार्डिओग्राम मशीन(इ.सी.जी.), ऑक्सिजन सुविधा, सुसज्ज जनरल वॉर्ड व स्पेशल रुम,एक्सरे, मुळव्याध, जनरल सर्जरी-अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, फिशर, फिस्चुला, पित्ताशय खडे व गाठी, आतड्याचे विकार, मुतखडा, प्रोस्टेट, स्तनांच्या गाठी, मानेवरील गाठी, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (गर्भपिशवी,अपेंडिक्स), जनरल मेडिसिन- मधुमेह, ब्लडप्रेशर, पोटाचे विकार,सर्व संसर्गजन्य रोग, रक्त संबंधी आजार, डेंग्यू , मलेरिया टायफाईड, डायरिया, न्यूमोनिया  रक्त चढविण्याची सुविधा राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here