आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर कॅरम स्पर्धेत निवड

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

क्रीडा युवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि अमळनेर क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेरमध्ये पहिल्यांदाच कॅरम स्पर्धेचे आयोजन ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये केले होते. त्यात विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

१४ वर्षाखालील गटात कृष्णा धीरज बडगुजर, १७ वर्षाखालील गटात प्रशांत ईश्वर वानखेडे, लतिष्क भाऊलाल धनगर, १९ वर्षातील गटात तुषार विजय राठोड, चेतन विलास पाटील या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. त्यांना अमळनेर क्रीडा समिती संयोजक ए.पी.वाघ, क्रीडा समिती सदस्य प्रा. ए.के.अग्रवाल, सदस्य व्ही.जी. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत पाटील, प्राचार्य पी.एम.कोळी, क्रीडा शिक्षक व्ही. जी. बोरसे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिकांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here