मुंबई, वृत्तसंस्था । सातत्याने महागणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे (Petrol diesel price hike) सामान्यांचं जगणं आणखी कठीण झालं आहे. आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली ( Petrol diesel price hike on 09th October 2021 ) आहे. सरकारी तेल कंपन्यानी आज पेट्रोलच्या किंमतीत 30 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 109.83 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर शंभरीपार गेल्याने 100.29 रुपये प्रति लीटर आहेत. या राज्यांत 100 रुपयांपार पेट्रोल मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपार आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कर आणि वाहतुकीच्या खर्चामुळे विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील फरक असतो. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या जातात. अखेर TATA समूहाची झाली Air India, जेआरडींचा फोटो शेअर करत रतन टाटा म्हणाले.. चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 09 October 2021) >> दिल्ली पेट्रोल 103.84 रुपये आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.83 रुपये आणि डिझेल 100.29 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.27 रुपये आणि डिझेल 96.93 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.52 रुपये आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर अशाप्रकारे तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात.
नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. RBIने बदलला बँक व्यवहारासंबंधित महत्त्वाचा नियम, 2 लाखांऐवजी पाठवता येणार 5 लाख तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.