आईच्या पुण्यस्मरणानिमित्त गरजू लहान मुलामुलींना खाऊ वाटप

0
1

यावल : तालुका प्रतिनीधी
‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ याची जाण ठेवत यावल येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील एलआयसी एजंट तरूणाने आपल्या आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त यावर्षी सुद्धा गोरगरीब मुला-मुलींना खाऊ वाटप करत मंदिरात रोख स्वरूपात देणगी दिली. या समाजसेवेची शहरात कौतुकास्पद चर्चा असून प्रत्येकाने आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच वाढदिवसानिमित्त आपापल्या कुवतीनुसार समाजसेवा केली तर खर्‍या अर्थाने प्रापंचिक परमार्थ साधला जाईल .
एलआयसी एजंट मुकेश घोडके यांनी दि.२५मे मंगळवार रोजी सकाळी आपल्या आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्त यावल येथील गोळीबार टेकडी, फैजपुर रोडवरील मनुदेवी मंदिर समोर लहान मुले-मुली मोठ्या स्त्री-पुरुषांना शेवचिवड़ा, बिस्किट, पेढे, चॉकलेट आपल्या लहान मुला-मुलींच्या आणि कुटुंबियांच्या तसेच मित्र मंडळीच्या हस्ते वाटप केले. यात कोणतीही प्रसिद्धी डोळ्या समोर न ठेवता किंवा कोणत्याही प्रकारच्या मान्यवरांना, राजकीय, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आमंत्रित न करता गोरगरीब आणि गरजू मुला-मुलींना स्त्री-पुरुषांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी स्वतःमुकेश घोड़के, चरण घोड़के, जितेंद्र घोड़के, अजय बाविस्कर, सागर सपकाले, तुषार येवले उपस्थित होते. तसेच यावल येथील साईबाबा मंदीरास व स्वामी समर्थ केंद्रात प्रत्येकी ११हजार रुपये रोख स्वरूपात देणगी दिली. सुरत येथील महादेव मंदीरास ५ हजार रुपये देणगी दिली. आपण नेहमी समाजाचे काही तरी देणे लागतो या शुद्ध भावनेतून आणि हेतूने जे आपल्याने शक्य होईल ते करत राहावे असे प्रत्यक्ष मुकेश घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here