जळगाव: प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् ॲकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान सुरु आहेत. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संंघ सहभागी झाले असून पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर आला आहे.
या स्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. दोन दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर कालपासून या स्पर्धेला सुरवात झाली. रविवारी महाराष्ट्र विरूद्ध त्रिपूरा व तामिळनाडू विरूद्ध बंंगाल यांच्यात १४ षटकांचा सामना खेळविण्यात आला. त्यात महाराष्ट्र संघाने निर्धारित १४ षटकांत २ गडी बाद ८१ धावा केल्यात.प्रतिउत्तरात त्रिपूराचा संघ १४ षटकात केवळ ७३ धावा करू शकला.अशाप्रकारे महाराष्ट्र संघ ८ धावांनी विजयी झाला. या सामन्यात ईश्वरी सावकार ही सामनावीर ठरली.
तामिळनाडू विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात तामिळनाडू संघाने निर्धारित १३ षटकांत ५ गडी गमावून ६८ धावा केल्या. पश्चिम बंगालने हा सामना ११ व्या षटकात ३ गडींच्या मोबदल्यात ७३ धावा करून ७ गडी राखून जिंकला. सामनावीर म्हणून बंगालच्या मिता पॉल (३८ धावा) गौरव करण्यात आला.
सोमवारी झालेल्या स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात त्रिपूरा संघाला पश्चिम बंगालने १३ व्या षटकात गारद केले. कमी धावसंख्येचा पाठलाग करताना बंगाल संघाने १० षटकातच केवळ १ गडीच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज पार केले. सामनावीरचा पुरस्कार बंगालची श्रोयोसी हिला ३ गडी बाद केल्याने देण्यात आला.सामनावीरांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गिता धरमपाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दुसरा व स्पर्धेतील चौथा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात सुरू असून महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात सर्वबाद १०० धावा केल्यात. तामिळनाडूने १.२ षटकात बिनबाद ५ धावा केला असून सामना पावसामुळे थांबविण्यात आला.
संपुर्ण स्पर्धेत आतापर्यंत पश्चिम बंगाल ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर दुसऱ्या क्रमांवर असलेल्या महाराष्ट्र व चौथ्या क्रमांकावर असलेल्या तामिळनाडू यांच्या सामना पावसामुळे थांबविण्यात आला होता.