आंतरराज्य वरिष्ठ महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर;महाराष्ट्र संघाचा विजय

0
3

जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस्‌‍‍ ॲकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत चौथ्या दिवशीही पश्चिम बंगाल संघ अव्वल स्थानावर कायम आहे तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र संघ पोहचला असून या संघाचा नेट रनरेटही चांगला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या पहिला सामन्यात पश्चिम बंगालने त्रिपुरा संघावर मात केली.प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पश्चिम बंगाल संघाने निर्धारित २० षटकांत झुमिया खातून ३६ (३७ चेंडू) धावाच्या मदतीने ८ गडी गमावून १११ धावा केल्यात. त्रिपुरा तर्फे हिना हिने सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्रिपुरा संघाने ११२ धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजी करताना रिजू सहा हिच्या नाबाद ४३ धावा वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही. त्रिपुरा संघ ५ गडी बाद १०३ धावांपर्यंत मजल मारता येईल.बंगाल संघ ८ धावांनी विजयी झाला. या सामन्यात ३६ धावा व २ बळी घेणारी झुनिया खातून ही सामनावीर ठरली. अनुभूती निवासी स्कूलचे व्यवस्थापक विक्रांत जाधव यांच्याहस्ते तिला ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्राचा तामिळनाडूवर विजय
काल दुसऱ्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करतांना २० षटकात ६ बाद १२६ धावा केल्या.त्यात किरण नवगिरे ३८,,कर्णधार तेजल हसनबनीस ३०, अनुजा पाटील २३ आदिती गायकवाड २१ धावा नाबाद यांनी योगदान केले.१२६ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेला तामिळनाडूचा संघ १८ व्या षटकात फक्त ५९ धावांमध्ये गारद झाला.अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सामनावीर अनुजा पाटीलला जैन इरिगेशनचे मीडियाचे व्हाईस प्रेसिडेंंट अनिल जोशी यांंच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, पंच संदिप जारे, अनिल सोनवणे उपस्थित होते. मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here