अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी युवकास अटक

0
26

बोदवड ः प्रतिनिधी

अल्पवयीन मुलगीबरोबर प्रेमाचा बनाव करून तिला पळून घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेऊन बलात्कार केल्याप्रकरणी प्रविण संजय बावस्कर (वय -24 ) रा.जलचक्र खु. ता . बोदवड यास पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 4 वाजेच्या पुर्वी फिर्यादीचे राहते घरातुन जलचक्र खु. येथून आरोपीने अल्पवयिन मुलीला पळवून नेले होते.आरोपीवर भादवि कलम 363 , 376 (2), 366 (अ) सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.नि.राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय अंकुश जाधव करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here