अबब… घोडगाव शिवारात कोट्यांवधीची अफूची लागवड

0
3

चोपडा ः प्रतिनिधी
तालुक्यातील घोडगाव शिवारात तब्बल 4 बिघा परिसरात अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दि.3 रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आले आहे. या अफूची किंमत अंदाजे करोडो असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. या घटनेमुळे अधिकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील वाकळी शिवारातील रहिवासी प्रशांत पाटील यांच्या मालकीच्या घोडगाव शिवारातील शेतात तब्बल 4 बिघे परिसरात अफूच्या झांडाची लागवड करण्यात आली असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती, त्यानुसार पोनि कुनगर यांनी यांच्यासह प्रभारी नायब तहसिलदार देवेंद्र नेतकर, पोउनि अमरसिंग वसावे, पो.कॉ.सुनिल जाधव, सुनिल कोळी, राजु महाजन, भरत नाईक, पोना.शशिकांत पारधी, लक्ष्मण शिंगारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता. चार बिघे परिसरात अफूच्या झाडाची लागवड करण्यात आल्याचे निदर्शनास आले, यावेळी कृषी अधिकारी प्रशांत देसाई यांनाही घटनेची माहिती कळवून बोलविण्यात आले होते. घटनास्थळी पोहचत संबंधित अधिकाऱ्यांचा दिवसभर पंचनामा सुरु होता. या अफूच्या झाडांची प्राथमिक किंमत अंदाजे कोट्यावधीच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस विभागाच्या या मोठ्या कारवाईमुळे अफू लागवड करणाऱ्यांचे धाबे दणादणले आहे. अशाप्रकारची लागवड या परिसरात अन्य कुठे करण्यात आली आहे का? याचा देखील तपास पेलिस विभागातर्फे करण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here