अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ 10 कोटींची ईडीकडून चौकशी सुरू

0
31

मुंबई : प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुलत भावाच्या सह-मालकीच्या कंपनीची ईडीकडून 10.9 कोटी रुपयांच्या कथित पेमेंटची चौकशी सुरू आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे अनिल देखमुखांना पाठवण्यात आले होते, असा ईडीला संशय आहे.
या कंपनीची चौकशी केली जात आहे. ही कंपनी सत्यजीत देशमुख यांच्या मालकीची आहे. सत्यजीत देशमुख हे अमेरिकास्थित लुईस बर्जरचे उपकंत्राटदार आहेत. तसेच ते वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार असून मुंंबई कोस्टल रोड आणि मुंंबई-नागपूर एक्स्प्रेस वे या दोन इतर हाय-प्रोफाइल प्रकल्पांसाठी देखील ते उपसल्लागार आहेत.
सत्यजीत देशमुख यांंनी ईडीकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, इनोवेव्हने यापूर्वी कोणताही सल्लागार प्रकल्प केलेला नाही. तसेच सप्टेंबर ते ऑक्टोबर 2021 दरम्यान तीन प्रसंगी, सत्यजीत यांना देशमुखांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी अधिकृत बैठकांमध्ये उपस्थितीबद्दल प्रश्न एजन्सीने विचारले होते.
ईडीच्या सूत्रांनुसार 2018 आणि 2020 च्या काळात एजन्सीने  द्वारे दोन कथित संशयास्पद व्यवहार केले. पहिले 3.81 कोटी रुपये अंश इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडला दिले होते, जी धवंगळेंच्या नियंत्रणात आहे. ते पैसे साहित्य आणि अंतर्गत कामासाठी खर्च म्हणून दाखवले आहे. परंतु बदल्यात कोणतंही काम केलं गेलं नाही, तसेच साहित्य देखील दिले गेले नाही, असं सत्यजीतने म्हटलंय. दुसरे पेमेंट 2019-20 मध्ये, धवंगळेच्या नियंत्रणाखाली असलेल्या ॲडव्हान्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स आणि ग्लोबल बिझनेस ॲडव्हायझरी सर्व्हिसेस या दोन कंपन्यांना 7.10 कोटी रुपयांचे होते. इथेही कोणत्याही सेवा देण्यात आल्या नव्हत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here