अडावद येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणाचा शुभारंभ

0
1

अडावद ता.चोपडा, प्रतिनिधी । ग्रामीण भागातील अडावद ता.चोपडा येथील “शामराव येसो महाजन विद्यालयात” विद्यार्थ्यांना कोवॅक्सिंन लसीकरणाचा पहिला डोस देऊन प्रारंभ दिनांक- ७ जानेवारी 2022 रोजी करण्यात आला.

शासनाने नुकतेच १५ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना लसीकरण करण्यास अनुमती दिली. चोपडा तालुक्यात ग्रामीण भागात पहिल्यांदाच शामराव येसो महाजन विद्यालयातील विद्यार्थ्यांना लसीकरण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ६७ विदयार्थी व विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला. सदरचे लसीकरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विष्णुप्रसाद दायमा,डॉ.अर्चना पाटिल,आरोग्य सहायक -प्रकाश पारधी,आरोग्य सेवक-डॉ.महेंद्र पाटिल, विजय देशमुख, आरोग्य सेविका-निवेदिता शुक्ल, आशा सेविका-शारदा महाजन, हिराबाई माळी यांच्या पथकाने शिबिरासाठी परिश्रम घेतले. प्रसंगी…मुख्याध्यापक-आर.डी.माळी सर, उपशिक्षक-आर.के. पिंपरे सर, एन.ए.महाजन सर, व्ही. एम.महाजन सर, एन.ए. महाजन सर, एस. जी. महाजन सर, एम.एन. माळी सर, पि.आर. माळी सर, एस. बी. चव्हाण सर, एस.के. महाजन सर, पि.एस. पवार सर, सि. एस. महाजन सर, ईश्वर मिस्तरी सर, रवींद्र माळी, अशोक महाजन, कैलास महाजन आदी सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचऱ्याचे अनमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here