अडावद, प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथे मॅनेज (हैदराबाद),वनामती (नागपूर),आत्मा (जळगाव) आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भगिनी मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय, अडावद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी विस्तार सेवा पदविका प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन बोलतांना माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी देशात कृषी संस्कृती अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
सदर अभ्यासक्रम हा एक वर्षाचा असून यात ४० प्रशिक्षणार्थींनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. संपूर्ण देशभरातील कृषीतज्ञ या वर्गाला ऑनलाइन व प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार असल्याचे प्राचार्य डाॅ.अनिल माळी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आत्मा, जळगावचे प्रकल्प उपसंचालक के. एन. तडवी तर विशेष अतिथी म्हणून घटक कृषि तंत्र विद्यालय, जळगाव येथील प्राचार्य डाॅ. एम. आर .बेडीस, माजी उपसंचालक पी. के. पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, उद्योगपती आशिषभाई गुजराथी, फर्टीलायझर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष नेमीचंद जैन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा विजयाताई पाटील, माजी जि .प .सदस्य विजय पाटील, साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनशाम अण्णा पाटील, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, वसंतभाई गुजराथी यांच्यासह भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्ष छायाबेन गुजराथी, उपप्राचार्य आशिष गुजराथी हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. पाटील व आभार प्रदर्शन सुनील गुजराथी यांनी केले.