अन्नत्याग उपोषणाला जिल्हा वकिल संघाचा पाठिंबा

0
20

साईमत जळगाव प्रतिनिधी

खडके बालगृह अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या बालकल्याण समितीला बरखास्त करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे सुरु असलेल्या अन्नत्याग उपोषणाला दि. २३ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा वकील संघाने पाठिंबा दिला.

महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे राज्य उपाध्यक्ष अॅड. दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांनी दि. १९ जानेवारी पासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान विविध सामाजिक संघटना यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दिला आहे.
बाल लैंगिक सारख्या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बालकल्याण समितीने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणं अपेक्षित होतं मात्र तसं न झाल्याने पीडित बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘मासू’ विद्यार्थी संघटनेने बेमुदत उपोषण सुरु केले आहे, उपोषणाला ५ दिवस उलटून देखील समिती बरखास्त करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही.

बाल कल्याण समितीतील तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर सदस्यांची राज्य चौकशी समितीद्वारे ऑगस्ट – २०२३ महिन्यातच चौकशी पुर्ण झालेली आहे. खडके बालगृह अत्याचार प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन येथे दि.२६.०७.२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे.प्रकरण गंभीर असून समिती बरखास्त होतं नसल्याने आश्चर्य वाटत असल्याचे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे.
जळगाव जिल्ह्यातील खडके, ता. एरंडोल येथे कै. य. ब. पाटील मुलींच्या बालगृहात लैंगिक शोषणाची गंभीर स्वरुपाची घटना घडल्या प्रकरणी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष देवयानी गोविंदवार, सदस्य विद्या बोरनारे व सदस्य संदीप पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालकल्याण समितीच्या बरखास्तीसाठी सुरु असलेल्या अन्न त्याग उपोषणास जळगाव जिल्हा वकिल संघाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला असून उपोषणस्थळी वकील संघांचे अध्यक्ष ॲड. रमाकांत पाटील, सचिव कल्याण पाटील, माजी सचिव ॲड. आनंद मुजुमदार, माजी सचिव सुभाष तायडे, माजी अध्यक्ष कैलास भाटीया, विधी सरकारी वकील ॲड. राजेश गवई, ॲड, सुनिल इंगळे, ॲड. लिना म्हस्के, ॲड. वैशाली चौधरी, ॲड. पल्लवी जोशी, ॲड. परिनिता फेगडे, ॲड. रुपाली शिवदे, ॲड. माधुरी बडगुजर, ॲड. निशांत शिंपी, ॲड. दिपक सोनवणे, ॲड. राजकुमार हरणे, ॲड. अर्जुन खैरनार, ॲड. सुकलाल सुरवाडे, ॲड. समाधान सुरवाडे, ॲड. दाजीबा भालेराव, ॲड. अरुण चव्हाण, ॲड. प्रशांत बाविस्कर यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here