जिल्हा परिषदेचे प्रशासन भ्रष्टाचारांना घालतेय पाठीशी?

0
52

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील कोसगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी १४ व्या वित्त आयोगातून त्यांच्या नावे दोन वेळा प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश काढून याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही एक वर्षात ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांना न्याय न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष निवेदन सादर करून प्रशासन भ्रष्टाचारांना पाठीशी घालत आहे. समजून घेताना व कारवाई होत नसल्याने येत्या आठ दिवसात जर कारवाई नाही झाली तर सर्व सदस्य आपल्याकडे राजीनामे देऊ, असे निवेदन सादर केल्याने प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचारांना कसे पाठीशी घालतात हे उघड झाले आहे.

यावल तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी शासनाकडून येणाऱ्या निधीचा दुरुपयोग करून स्वतःच्या फायद्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून प्रत्येकी दोनवेळा २० हजार रुपये असे ४० हजार रुपये त्यांच्या नावे धनादेशाद्वारे पैसे बँकेत वटविले आहेत. यासंदर्भात कोसगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मनीषा सपकाळे यांनी व सदस्य विनोद पाटील, संभाजी पवार, आशाबाई पाटील, संगीता चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यावल यांच्याकडे रितसर तक्रार केलेली होती. त्या अनुषंगाने यावल पंचायत समितीमधून ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी याप्रकरणी चौकशी करून जाबजबाब नोंदवून घेतलेले होते. त्यानुसार पुन्हा गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी पुन्हा चौकशीचे आदेश देऊन विस्तार अधिकारी पंचायत समिती वैराडकर यांनी सुद्धा क्रॉस चेकिंग केली होती. यासंदर्भात यावल पंचायत समितीकडून अहवाल जिल्हा परिषदेकडे ३१ मे २३ रोजी सादर करून जिल्हा परिषदेकडे ३९ एक नुसार कारवाई प्रस्तावित करण्याचे यासंदर्भात अहवाल नमूद केलेली असून असा अहवाल पाठविण्यात आलेला आहे.

यावल तालुक्यातील कोसगाव येथील ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषदेत जाऊन धडकले. त्याठिकाणी या प्रकरणासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांच्या दालनात गेले असता येथील क्लार्क गोपाळ पाटील यांनी अहवालच आमच्याकडे आलेला नाही, असे सांगण्यात आले. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात जिल्हा परिषदेकडून माहिती संबंधितांना प्राप्त झालेली आहे. त्यात अहवाल प्राप्त झालेला आहे. उचित कार्यवाहीसाठी आयुक्त कार्यालयाकडे नाशिक येथे प्रकरण पाठविण्यात आले आहे, असे स्पष्ट नमूद केले आहे.

जिल्हा परिषद प्रशासन का म्हणून कोसगाव ग्रामपंचायत सदस्यांना वेड्यामध्ये काढत आहे. यावल तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायतीच्या उघड उघड दिसणाऱ्या भ्रष्टाचाराकडे जिल्हा परिषद विभागाने नेमके दुर्लक्ष का केले? याबाबत साशंकता निर्माण झाली असून भ्रष्टाचाऱ्यांना प्रशासन पाठिंबा देत असल्याचे उघड दिसत आहे तर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना वारंवार भेटूनही येथील ग्रामपंचायत सदस्यांना व उपसरपंच यांना ठोस माहिती मिळत नाही. याबाबत लवकरात लवकर जिल्हा परिषद प्रशासनाने निर्णय न घेतल्यास सरपंच वगळता सर्व सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here