साईमत जळगाव प्रतिनीधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव “युवारंग २०२३” चे आयोजन दि. ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात करण्यात आले आहे.
विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि केसीई सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा युवक महोत्सव होत असून सहभागी होणा-या महाविद्यालयांना नोंदणीसाठी दि. २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर युवारंग लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन सर्व माहिती भरल्यानंतर संघ नोंदणीची प्रत डाऊनलोड करून त्यावर प्राचार्य व विद्यार्थी विकास अधिकारी यांची स्वाक्षरी घेवून दि. २९ सप्टेंबर रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत आयोजक महाविद्यालयाला प्रत सादर करणे अनिवार्य आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
५ मुख्य कलाप्रकारातील एकुण २६ उपप्रकारच्या स्पर्धा या महोत्सवामध्ये होणार आहेत.
युवक महोत्सवात संगीत – शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, स्वरवाद्य, नाट्य संगीत, सुगम संगीत, भारतीय समुहगान, भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, पाश्चीमात्य गायन, पाश्चीमात्य वाद्यसंगीत आणि पाश्चीमात्य समुहगान, नृत्य – भारतीय नृत्य व लोक समुहनृत्य, वाङमयीन कलाप्रकार – वकृत्व व वादविवाद स्पर्धा, रंगमंचीय कलाप्रकार – नक्कल (मिमीक्री), मुकअभिनय (माईम), प्रहसन (स्कीट), ललीत कला – स्थळचित्र (ऑनदीस्पॉट पेटींग), चिकटकला (कोलाज), पोस्टर मेकींग, मातीकला (क्ले मॉडेलिंग), व्यंगचित्र (कार्टून), रांगोळी, स्थळछायाचित्र (स्पॉट फोटोग्राफी), इन्स्टॉलेशन, मेंहदी
याशिवाय सांस्कृतिक पथसंचलन देखील या महोत्सवात होणार आहे. विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने संलग्नित महाविद्यालये/परिसंस्था आणि प्रशाळा यांना महोत्सवाचे सविस्तर परिपत्रक पाठविण्यात आले आहेत. स्पर्धकाचे वय २५ वर्षापेक्षा जास्त नसावे, एका स्पर्धकाला जास्तीत जास्त तीन उपकलाप्रकारात सहभागी होता येईल आणि ललीत कलाप्रकारातील स्पर्धेत जास्तीत जास्त दोन उपकलाप्रकारात सहभाग घेता येईल. अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली. यासंदर्भात आयोजक महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. जुगलकिशोर दुबे (९४२३४९९४५५) अथवा डॉ. मनोज महाजन सहसमन्वयक (९६५७०२५२८८) यांच्याशी संपर्क साधता येईल. गतवर्षापासुन जिल्हानिहाय तीन प्रोत्साहनपर “फिरते चषक” देण्यात येत आहेत. यावर्षी देखील ते दिले जाणार आहेत.