युवकांनी ध्येय निश्चित करून स्वतःला सिद्ध करावे

0
20

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील बी. पी. आर्टस्‌‍‍ , एस.एम. ए. सायन्स अँण्ड के. के. सी. काँमर्स महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “युवा संवाद” कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी सर्पमित्र राजेश ठोंबरे, उपप्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे, उप-प्राचार्या डॉ.के.एस.खापर्डे, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मनोज गोविंदवार (जळगाव) यांनी आपल्या मनोगतात युवकांमधील असिमीत क्षमता सृजनशिलतेतून वृध्दिंगत करता येते. भविष्यात स्वतःला सिद्ध करण्यासाठी युवकांनी कला गुणांचा अंगीकार करावा, याविषयी मार्गदर्शन केले. मिनाक्षी निकम (राज्यपाल नियुक्त, क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव, सिनेट सदस्या) यांनीही युवकांशी संवाद साधला. युवकांनी स्वतःचा सन्मान करावा, दुसऱ्याच्या हातातील कटपुतलीसारखे जीवन न जगता, ध्येय निश्चित करून स्वतःला सिद्ध करावे, याविषयी मत व्यक्त केले. कार्यक्रमातील वक्ते तथा सिनेट सदस्य प्रा.सुनील निकम यांनी त्यांच्या मनोगतात उद्याचा भारत युवकांच्या खांद्यावर टिकून आहे. भारताची खरी शक्ती युवक असून युवकांवर मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले. प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी अध्यक्षीय मनोगतात, युवाशक्ती सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. युवकांवर पूर्ण विश्वास असल्याचे मत व्यक्त केले. स्पर्धाशील जगासमोर भारत एक शक्ती म्हणून पुढे आला आहे. त्यात युवकांचे योगदान मोठे आहे, याविषयी मार्गदर्शन केले.

यांनी घेतले परिश्रम

नियोजनासाठी उपप्राचार्य डी.एल.वसईकर यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी प्रा.रवींद्र पाटील, प्रा.प्रमोद पवार, प्रा.डी. बी.पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा.रवींद्र बोरसे, सूत्रसंचालन सहा. महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नयना पाटील तर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.प्रभाकर पगार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here