साईमत, जळगाव : प्रतिनिधी
आजच्या तरूणांनी धार्मिक गुण अंगी जोपासण्याची गरज आहे. तरूणपणात अर्धे आयुष्य वेळेअभावी गमावून बसतो. त्यानंतर जेव्हा काठी टेकायची वेळ येते तेव्हा आपल्याला देव आठवतो. जर मुलांवर किंवा परिवारावर धार्मिकसह चांगले संस्कार दिले तर नक्की त्यांचे भविष्य उज्ज्वल होवू शकते, असे मत दैनिक ‘साईमत’चे उपसंपादक शरद भालेराव यांनी व्यक्त केले. ते पिंप्राळा भागातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आयोजित आरतीनंतर मनोगतात बोलत होते. यावेळी शरद भालेराव आणि सौ.रेखा भालेराव यांच्याहस्ते महादेवाची आरती करण्यात आली. यावेळी दोघांचा मंदिराच्या ट्रस्टतर्फे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नरेश बागडे, धनंजय सोनार, मधुकर ठाकरे, देविदास पाटील, सरदार पाटील, विजय भावसार, कैलास कोळी, संजय भोई, प्रकाश कदम, सुर्यकांत पारखे, हेमराज गोयर,मनिषा चव्हाण, योगिता पाटील, ज्योती भावसार, सविता पाटील, नंदिता जोशी, हिमांशु भालेराव, ऋषी सोनार यांच्यासह पिंप्राळा परिसरातील भाविक उपस्थित होते.