तमायचे युवा फाउंडेशनतर्फे आयोजित बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयराज भाट यांचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कंजरभाट समाजात आजही विविध समस्या आहेत. त्यामुळे युवकांनी समाजाच्या विकास आणि परिवर्तनासाठी तमायचेकर एकत्र यावे, असे आवाहन तमायचे युवा फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष जयराज भाट यांनी केले. ते जळगाव येथे दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. कंजरभाट समाजाच्या सभागृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सचिन (अप्पा) बाटुंगे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राकेश तमायचेकर, शशिकांत बागडे, अमळनेरचे अजय बागडे, गोपी बागडे, संजय मोती, कुंदन तमायचे, सचिन तमायचे, जिल्हाध्यक्ष गणेश बागडे आदी उपस्थित होते.
श्री.भाट पुढे म्हणाले की, सामाजिक विकास हा एक निरंतर चालणारा आणि सर्वांगीण प्रक्रिया आहे. समाजातील प्रत्येक घटकाने त्यात सक्रियपणे सहभागी होऊन आपल्या समाजाच्या प्रगतीत योगदान देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
बैठकीत विविध विषयावर चर्चा
बैठकीत कंजरभाट समाजाच्या मुला-मुलींना शाळेत पाठवणे, त्यांना चांगले शिक्षण देणे. तसेच समाजाच्या लोकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, युवकांना पुरेसे उत्पन्न देणारे रोजगार उपलब्ध करून देणे, समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळणे आदींसह विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यशस्वीतेसाठी यांनी परिश्रम घेतले
यशस्वीतेसाठी गणेश बागडे, शशिकांत बागडे, निलेश बागडे, विकास बागडे, संजय मोती, गौतम बागडे, योगेश बागडे, संदीप बागडे, सचिन तमायचे, विक्की बागडे, राकेश भाट, मंगल गुमाने, गोलू बागडे, पक्षा बागडे, परशु बागडे दादू बागडे, दिवेश बागडे, नितीन बागडे, संतोष बागडे, मुकेश बागडे, संदीप बागडे यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. सूत्रंचालन शशिकांत बागडे तर आभार गणेश बागडे यांनी मानले.