साईमत/ न्यूज नेटवर्क । रावेर ।
रावेर तालुक्यातील आदिवासी भागातले दोन प्रमुख रस्ते पाल- रावेर वाया कुसंबा आणि पाल-रावेर वाया आभोडा, या दोन्ही रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेत परिसरातील नागरिकांनी धनंजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘रास्ता रोको’ आंदोलन थेट ११ वाजेपासून चार वाजेपर्यंत केले. हे आंदोलन आभोडा आणि कुसुंबा फाटा येथे केले. दरम्यान, आदिवासी भागातील रस्त्यांसाठी युवा नेते धनंजय चौधरी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.
रस्ते २०२२ महाविकास आघाडीच्या काळात अर्थसंकल्प अधिवेशनात मंजूर केले होते. त्यानंतर महायुती सरकारने मंजूर कामे स्थगित केले. स्थगिती हटविल्यानंतर जळगाव उत्तर विभागाने या कामांना कार्यारंभ आदेश दिला. पण या रस्त्यांची दुर्दशा अशी की निव्वळ राजकीय दबावाने बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने रस्त्यांवर ६-७ अपघात आणि तीन गर्भवती महिलांचे रस्त्याने हॉस्पिटलला जातांना प्रसुती झाली होती. महसूल क्षेत्रात येणाऱ्या रस्त्यांविरोधात वन विभागाचा काही आक्षेप नाही. त्यामुळे तात्काळ काम सुरू करावे. वन परिसरातील रस्त्याची ‘स्पॉट व्हेरिफिकेशन’ला सोमवारी, १ जुलै रोजीचा मुहूर्त आणि दोन दिवसात एनओसी मिळावी, अशी मागणी आंदोलनावेळी करण्यात आली.
आंदोलनात यांचा होता सहभाग
आंदोलनात डॉ.राजेंद्र पाटील, राजु सवर्णे, महेंद्र पवार, योगेश ब्रीजलाल पाटील, लियाकत जमादार, संजय पवार, युनुस तडवी, सलीम तडवी, नारायण घोडके, प्रदीप सपकाळे, मुबारक तडवी, मुकेश पाटील, विवेक महाजन, भगवान महाजन यांच्यासह गावातील नागरिकांचा सहभाग होता.
