निंबादेवी धरण सांडव्याच्या पाण्यात तरुणाचा मृत्यू

0
58

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले मृत घोषित

साईमत/यावल/प्रतिनिधी :

तालुक्यातील सावखेडा परिसरातील भोनक नदीवरील निंबादेवी धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात तालुक्यातील निमगाव टेंभी येथील २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. तालुक्यातील निमगाव – टेंभी येथील वेदांत सूर्यवंशी (वय २०) हा तरुण सोमवारी दुपारी निंबादेवी धरणावर सांडव्याच्या पाण्यात गेला होता. तेव्हा अचानक पाण्यात बुडून त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा श्वास गुदमरला. त्याला तात्काळ किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल केले होते. तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

दरम्यान, निंबादेवी धरणावर काही वर्षांपूर्वी अशाच घटना घडलेल्या आहेत. पोलीस बंदोबस्त असताना निंबादेवी धरणावर सुसाट वेगाने वाहने चालवत मुले-मुली, स्त्री-पुरुष कशी काय जातात..? याबाबत आणि घडलेल्या घटनेबाबत यावल तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याकडे फैजपूर भागाचे डीवायएसपी, यावलच्या तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी लक्ष केंद्रित करून बंदोबस्तात गेलेले पोलीस प्रत्यक्ष त्याठिकाणी हजर राहतात किंवा नाही..? याबाबत कार्यवाही करावी आणि हजर राहत असल्यास मुले-मुली त्याठिकाणी पोहोचतात कशी…? त्याची सुद्धा चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here