घुसर्डीला विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

0
9

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर

येथुन जवळील घुसर्डी ता.पाचोरा येथे रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी केळी लागवडीसाठी पावटी पाडत असतांना लागलेल्या विजेच्या शॉकमुळे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. केळी लागवडीसाठी पावटी पाडतांना दुर्दैवाने तार तुटणे त्याच ठिकाणावरून ११ केव्ही गावठाणची वीज वाहिनी जाणे पावटी पाडण्यासाठी वापरलेला तार तुटून तो सरळ त्याच लाईनवर जाणे, अशी घटना घडल्याने पूर्ण गाव सुन्न झाले आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथील तरुण शेतकरी विकास धर्मा निकुंभ (वय २३) हे काका राजेंद्र निकुंभ, चुलत भाऊ साई व यश निकुंभ हे सर्व शेतात केळी लागवडीसाठी पावटी पाडण्याचे काम करत होते. पावट्या सरळ पडाव्या यासाठी तारने ते आखणी करत असतांनाच पावटी पाडण्यासाठी जो तार वापरण्यात आला होता. तो तुटल्यामुळे तार शेतातून गेलेल्या ११ केव्ही या गावठाणच्या लाईनवर गेल्याने लागलेल्या शॉकमुळे विकास धर्मा निकुंभ यांना बसलेल्या जबर शॉकमुळे ते शेताच्या बांदावर जाऊन बेशुद्ध पडले. हा प्रकार काका व चुलत भाऊंना लक्षात येताच त्यास तात्काळ कजगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ते मृत झाल्याचे घोषित केले. ही घटना गावात कळताच रुग्णालयाच्या परिसरात गर्दी झाली होती. मयत विकासच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, काका, चुलत भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here