साईमत, जळगाव/पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या तरुणाच्या घरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तीन तलवारी हस्तगत केल्या आहे. त्याच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तरूणाला अटक केली आहे. हर्षल विनोद राजपूत (वय २०, रा.मोहाडी, ता.पाचोरा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात हर्षल विनोद राजपूत हा त्याच्या घरात प्लास्टिक पिशवीत तीन तलवारी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
१० हजाराच्या तीन तलवारी हस्तगत
स.पो.नि. निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रीतम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश गोसावी, लोकेश माळी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रमुख ठाकूर, मोतीलाल चौधरी या पथकाने बुधवारी, ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत संशयिताला अटक केली. त्यानुसार पथकाने कारवाई करत १० हजार रुपये किंमतीच्या तीन तलवारी हस्तगत केल्या आहे.