जनतेची कामे केल्याशिवाय अधिकाऱ्यांवर तुमचा प्रभाव पडणार नाही

0
170

मनसेचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांचे प्रतिपादन

साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल :

गाव तेथे शाखा उद्घाटन करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भक्कम अशी फळी निर्माण करावी. तसेच जनतेची कामे केल्याशिवाय तुमचा म्हणजे मनसेचा अधिकाऱ्यांवर प्रभाव पडणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांनी केले. यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. त्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

बैठकीच्या सुरुवातीला प्रभारी राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, रावेर व चोपडा विधानसभा क्षेत्र जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे यांचा पक्षातील अल्प कामकाजाचा कडक आणि स्पष्ट शब्दात आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना देऊन शुक्रवार बाजाराच्या दिवशी नागरिकांचा संपर्क जास्तीत जास्त होण्यासाठी दुपारच्या वेळेस वेळ काढून एका ठिकाणी थांबून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा महत्त्वाच्या सूचना ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांनी दिल्या.

यांची होती उपस्थिती

बैठकीत संजय नन्नवरे, भगवान कोळी, संतोष जवरे, दिलीप कोळी, युवराज कोळी, गौरांग मराठे, प्रसन्न नाईक, रमेश वानखेडे, किशोर लावणे, के.के.कोळी, मोहसीन खान, कल्पेश पवार, ज्ञानेश्वर कोळी, पद्माकर कोळी, शुभम सोनवणे, सागर कुंभार, पंकज तावडे, दिलीप कोळी, योगेश ठाकरे, किरण भोई, एकनाथ कोळी, निलेश भोई,चेतन अढळकर, किशोर नन्नवरे, गौरव कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here