‘इग्लंड’ मध्ये योगेश अग्रवाल यांनी दिली ‘तिरंग्या’ला मानवंदना

0
19

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा होत असतांना इंग्लंडस्थित भारतीय दूतावासातही भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता तर इंग्लंडच्या वेळेनुसार सकाळी ९ वाजता झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात चाळीसगावचे युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित आ.बं. मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश रमेशचंद्र अग्रवाल हे सहभागी झाले होते. येथे दिमाखात फडकलेल्या तिरंग्याला त्यांनी मानवंदना दिली.

यावेळी दूतावासातील भारतीय उच्च आयुक्त विक्रम दोरास्वामी व खास भारतातून सोहळ्यासाठी उपस्थित असलेले भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी नरेश शेरावत, समीर पोटे आदी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याची अमृत पर्वणी सुरु आहे. थेट इग्लंडमध्ये झालेल्या सोहळ्याला उपस्थित राहणारे अग्रवाल हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव युवा उद्योजक ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here