Raisoni School In Premnagar : प्रेमनगरातील रायसोनी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिले योगाचे धडे

0
17

फायद्यांसह आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर मार्गदर्शन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सीबीएससी पॅटर्न) येथे शनिवारी, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या योगासनांचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी योगाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे फायदे समजावले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार, वृक्षासन, वीरभद्रासन, ताडासन, अर्धमत्स्येन्द्रासन, अर्धहलासन, अनुलोम-विलोम अशी विविध योगासने करून घेतली. यावेळी योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. उपक्रमात विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी विद्यार्थ्यांना योगासनांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. उत्कृष्ट योगासने करून दाखविलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी अधिक आवड निर्माण झाल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here