होय, मी बाळासाहेबांच्या धनुष्यबाणावरच लढणार

0
46

साईमत जळगाव प्रतिनिधी

होय, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून मी येणारी निवडणूक धनुष्यबाणावरच लढणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते , पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ते धरणगाव तालुक्यातील पिंपळे गावातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

पिंपळे खु. ते धरणगाव हा मधला उर्वरित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असून पिंपळे व परिसरातील गावाच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगून गाव विकासासाठी पिंपळे गावाची एकजूट कौतुकास्पद आहे. पिंपळेकरांनी कायमच माझ्यावर निवडणुकीतही भरभरून प्रेम केलं आहे. तुमचे आशीर्वाद आयुष्यभर विसरू शकणार नाही, अशा भावना ना. पाटील यांनी व्यक्त केल्या.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, कृ. उ. बा. समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील सर, माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरीताई अत्तरदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन नाना पाटील माजी सभापती प्रेमराज पाटील , मुकुंदराव नन्नवरे, सरपंच कविता पाटील, विनोद पाटील, उपसरपंच किरण पाटील, ग्रा.पं. सदस्य मंगला पाटील, मानसी पाटील, सुनंदा पाटील, समाधान पाटील, शिवसेनेचे व युवासेनेचे शाखा प्रमुल अनिल पाटील, ललित पाटील, किरण पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, शेतकी संघाचे संचालक गजानन पाटील, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मराठे, शहर प्रमुख विलास महाजन, गटनेते पप्पू भावे डी.ओ. पाटील, मोतीआप्पा पाटील, सुदर्शन पाटील , मोहन शिंदे , सुभाष पाटील , निंबा कंखरे, शरद पाटील, महिला आघाडीच्या प्रिया इंगळे, पुष्पांताई पाटील, भाऊसाहेब पाटील भरत सैंदाने यांच्यासह परिसरातील सरपंच व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
धरणगाव तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण – 1कोटी 34 लक्ष, पिंपळे फाटा ते पिंपळे खु रस्ता डांबरीकरण -18 लक्ष, तर मूलभूत सुविधेअंतर्गत (2515) रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे – 33 लक्ष, स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण व रस्ता काँक्रीटीकरण – 30 लक्ष, गटार बांधकाम – 5 लक्ष, फिल्टर प्लान्ट बसविणे – 3.85 लक्ष असे एकूण 2 कोटी 30 लाखाच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक कैलास पाटील यांनी केले. प्रास्ताविकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील यांनी गावात पालकमंत्री यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांची माहिती विशद करून संरक्षण भिंत व शाळेला पेव्हिंग ब्लॉक बसवण्याची मागणी केली तर आभार शाखाप्रमुख अनिल पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here