यावलला तालुका शिवसेनेची बैठक उत्साहात

0
7

यावल : प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खुल्या जागेवर तालुका शिवसेना शिंदे गटाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे होते.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन संचालक निवडून आणले. याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे व मित्र पक्षाचे कौतुक केले. आपल्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत विकास कामे करण्याबाबत मार्गदर्शनपर आवाहन माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी केले. शिवसेनेच्या संघटनेबाबत प्रत्येकाने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ज्या राबविल्या जात आहे. त्याबाबत जनतेसमोर जाऊन जनतेला माहिती देऊन मेहनत कशी घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील यांनी त्यांना संचालकपदी निवड केल्याबद्दल माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. भरत चौधरी यांनी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व आ.लता सोनवणे यांची विकास कामे निवडणुकीत फायदेशीर ठरतील, असे मत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती

बैठकीला मुख्य मार्गदर्शक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष साळुंखे, सूर्यभान पाटील, कृ.उ.बा.समितीचे उपसभापती बबलू कोळी, भरत चौधरी, गोटू सोनवणे, विकास साळुंखे, लक्ष्मण बडगुजर, विनायक पाटील, प्रताप सपकाळे, मोहन सपकाळे, विलास अडकमोल, दीपक कोळी, मुबारक तडवी, पराग महाजन, आशिष झुरकाडे, गजानन कोळी, समाधान सोनवणे, दिनेश साळुंखे, प्रकाश कोडी, राजू पाटील, ईश्वर पाटील, परिसरातील व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here