हरिपुरा राऊंड स्टाफला चौपट बेवारस आढळले
साईमत/यावल/प्रतिनिधी :
यावल पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल यांच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास १ हजार ६६० रुपये किमतीच्या सागवान लाकडाच्या पाच चौपट बेवारस स्थितीत असलेल्या हरिपुरा राऊंड स्टाफ यांना आढळून आल्याने साग चौपट नग पाच घ.मी. ०.०८२ अंदाजे किमत १ हजार ६६० रुपयांच्या जप्त करून शासकीय वाहनाने मु.वि. केंद्र यावल येथे पावतीने जमा केले. याप्रकरणी प्र. री. क्र.१०/२०२४ अन्वये व.र. हरिपूरा यांनी नोंदविला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव येथील यावल वनविभाग उपवन संरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक समाधान पाटील, यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, वनरक्षक हरिपूरा अशरफ तडवी, वनरक्षक सुधीर पटणे, वनरक्षक अक्षय रोकडे, वाहन चालक शरद पाटील यांनी केली. पुढील तपास अशरफ तडवी वनपाल हरीपुरा (अतिरिक्त कार्यभार) करीत आहे.