यावल न.प.चे कामकाज ‘रामभरोसे’ मुख्याधिकाऱ्यांचा मोबाईल ‘नो रिप्लाय’

0
18

साठवण तलाव ‘ओव्हर फ्लो’, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सह आयुक्तांचे दुर्लक्ष

साईमत/यावल/प्रतिनिधी :

शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नगरपरिषदेने साठवण तलावाचे बांधकाम केले आहे. तो साठवण तलाव गुरुवारी, २९ रोजी ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेल्याने तसेच साठवण तलाव फुटण्याची भीती निर्माण झाल्याने यावल शहरात जोरदार चर्चा सुरू झाली. याबाबत यावल नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल ‘नो रिप्लाय’ झाल्याने माहिती मिळाली नाही.

यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी म्हणून चोपडा येथील मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याकडे यावल नगरपरिषदेचा प्रभारी पदभार दिला आहे.यावल नगर परिषदेच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी अनेकांच्या आहेत. आणि कार्यालयात दाखल माहिती अधिकार अर्ज प्रथम अपील अर्ज यांची सुनावणी मुदतीत घेतली जात नसल्याने यावल नगरपरिषदेच्या भोंगळ आणि सोयीनुसार सुरू असलेल्या कामकाजाकडे जिल्हाधिकारी जळगाव, नगरपालिका शाखा जळगावचे सह आयुक्त जनार्दन पवार यांच्यासह प्रशासक म्हणून प्रांताधिकारी बबनराव काकडे यांचे दुर्लक्ष होत असल्याचे यावल शहरात चर्चिले जात आहे.

यावल नगरपरिषदेने यावल शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी तसेच साठवण तलावातील पाणी अंदाजे दोन महिने पुरवठा केला जाईल अशा अंदाजे २५० ते ३०० एमडी क्षमतेचा साठवण तलाव बांधकाम केले आहे. साठवण तलावात हतनूर धरण पाटातून पाण्याचा उचल होत असतो. गेल्या दोन-चार दिवसांपूर्वी पाटातून साठवण तलावात पाणी घेण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु अचानक साठवण तलावातून पाणी ‘ओव्हर फ्लो’ होऊन साठवण तलावाच्या बाहेर लाखो लिटर पाणी वाहून गेले. साठवण तलावाजवळ काही ठिकाणी जमिनीला तळे, भेगा पडल्याने साठवण तलावाला भगदाड पडून साठवण तलाव फुटणार या भितीने संपूर्ण यावल शहरात चर्चेला उधाण आले होते.

याबाबतची माहिती घेण्यासाठी आज दुपारी यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी ‘नो रिप्लाय’ झाला. साठवण तलावाच्या ठिकाणी कोण कर्मचारी कोणत्या अधिकाऱ्याच्या जवळचा आहे आणि साठवण तलाव ओव्हर क्लब झाला कसा…? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबाबत पाणीपुरवठा स्वच्छता विभाग प्रमुख सत्यम पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांना साठवण तलावाच्या ‘ओव्हर फ्लो’ पाण्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी वृत्तास दुजोरा देऊन पाटाजवळ पाणी सोडण्याचा “व्हाल” खराब झाला असल्याची माहिती दिली. लवकरच तो व्हाल दुरुस्त केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावल नगरपरिषदेच्या विविध सुख-सुविधांबाबत यावल शहरातील अनेकांच्या लेखी तोंडी तक्रारी आहेत. कार्यालयातील विभाग प्रमुख कोण कुठे प्रभारी म्हणून काम करीत आहे…? ठेकेदारांची कामे बिले काढणे इत्यादी आर्थिक स्तरावरील कामे वेळेवर कशी होतात…? आणि विभाग प्रमुख यावल नगरपालिकेत केव्हा आणि कोणत्या वेळेस येतात आणि जातात यासह माहिती अधिकाराचे अर्ज, प्रथम अपील अर्ज प्रलंबित आहेत. याकडे प्रभारी मुख्याधिकारी हेतू पुरस्कार आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे हितसंबंध लक्षात घेऊन दुर्लक्ष करीत असल्याने यावल नगरपरिषदेच्या कामकाजाकडे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, फैजपूर भागाचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे आयुक्त जनार्दन पवार यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण यावल शहरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here