Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल – रावेर तालुक्यास वरदान ठरणार्‍या मेगा रिचार्ज साठी
    जळगाव

    यावल – रावेर तालुक्यास वरदान ठरणार्‍या मेगा रिचार्ज साठी

    SaimatBy SaimatJuly 14, 2022Updated:July 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांची अमोल जावळे यांनी मुंबई येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या सोबत सदिच्छा भेट घेतली. युती सरकारच्या काळात कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या मागणीची दाखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीच्या माध्यमातून शेळगाव प्रकल्प आता पूर्णत्वाकडे आहे. स्व.हरिभाऊंचे स्वप्न असलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल अमोल जावळेंनी या भेटीत त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि धन्यवाद व्यक्त केले. तसेच यावल – रावेर तालुक्यास वरदान ठरणार्‍या मेगा रिचार्ज प्रक्ल्पास गती द्यावी यासाठी घातले आहे.

    कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे यांचे स्वप्न असलेला मेगा रिचार्ज प्रकल्प स्व.हरिभाऊ यांनी त्यांच्या कार्यकाळात संसदेत सातत्याने पाठपुरावा करून प्रकल्पाच्या कामास गती मिळवून दिली होती.जळगाव जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्ष्यात घेता मेगा रिचार्ज प्रकल्पाचे अनन्य साधारण असे महत्व आहे.या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता मेगा रिचार्ज प्रकल्पास गती द्यावी असं साकडं जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने अमोल जावळे यांनी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ.गिरीशभाऊ महाजन यांना साकड घातले आहे.

    एशियातील नावीन्य पूर्ण मेगा रिचार्ज प्रकल्पाचे तीन टप्पे आहेत. धरण, उजवा कालवा आणि डावा कालवा.धरण आणि उजवा कालव्याचा डीपीआर तयार असून डाव्या कालव्याच्या टप्पा १ चा डीपीआर पूर्णत्वाकडे आहे.व्याप कॉक्स हि कंपनी या प्रकल्पाचे काम बघत आहे.या कंपनीने संपूर्ण प्रकल्पाचे एकत्रीकरण करून संयुक्तिक प्रकल्प अहवाल संप्टेंबर 22 महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात याव्यात. तसेच ह्यानान्तर केंद्रीय ग्रामीण भूजल मंत्रालयास प्रकल्प अहवाल सादर करून प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा असे साकडे मी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी जलसंपदा मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन यांना घातले आहे . हा प्रकल्प नाविन्य पूर्ण पद्धतीने जलसंवर्धनाच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्बन शून्य भारताच्या दिशेने हे मोठं पाऊल असणार आहे अश्या भावना अमोल जावळे ह्यांनी  व्यक्त केल्या आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : स्वच्छतेवर कारवाईची चेतावणी महापौर दीपमाला काळे प्रशासनावर संताप

    February 17, 2026

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.