Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीला यावल, फैजपुरला प्रतिसाद
    यावल

    लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीला यावल, फैजपुरला प्रतिसाद

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, यावल : प्रतिनिधी

    शहरासह तालुक्यात तसेच फैजपूरसह इतर अनेक ठिकाणी लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रम (स्विप) अंतर्गत जनजागृती रॅली व प्रबोधनाचे कार्यक्रम प्रांताधिकारी आणि यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी, २ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आले. लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रमाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. यामध्ये ह.भ.प.संचित कोळी महाराज सरस्वती विद्यामंदिर यावल यांनी मतदानाच्या संदर्भात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. याप्रसंगी यावल शहरातील शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

    कार्यक्रमाला प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटशिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी विश्‍वनाथ धनके, नायब तहसीलदार विनंते, रशीद तडवी, मुख्याध्यापक गजानन कुलकर्णी, मुख्याध्यापक एम. के.पाटील, श्री.नन्नवरे, श्री.काटकर, केंद्रप्रमुख शाकीरदादा, यावल शहरातील शाळेतील शिक्षक उपस्थित होते. सर्वप्रथम गावातून रॅली काढून झाल्यानंतर यावल बसस्थानक येथे कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कीर्तनाच्या माध्यमातून मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावल सरस्वती विद्यामंदिराचे डॉ.नरेंद्र महाले हे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थी यांनी कीर्तनामध्ये सहभाग घेऊन उत्तम प्रबोधनाचे कार्य केले.

    बस स्थानकात विविध गावातून आलेले नागरिक जे मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यांची कीर्तनाला दाद मिळाली. तहसीलदार नाझीरकर यांनी मतदानाचे कार्य पवित्र कार्य आहे. यासाठी सर्वांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवावा. यासंदर्भात मतदारांना मार्गदर्शन केले.

    गटशिक्षणाधिकारी धनके यांनी विद्यार्थ्यांना आपण प्रबोधनाच्या कार्यात सहभाग घेऊन आपल्याला शक्य असेल तितके मतदानासाठी आपल्या गावातील नातेवाईक, मित्रमंडळी, घरातील सदस्य, ज्यांना मतदानाचा हक्क आहे त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचे आहे. यासंदर्भात मतदारांना विशेष आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महालेतर आभार मुख्याध्यापक एम.के.पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.