यशोधाम पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजला शालेय बेसबॉल स्पर्धा उत्साहात

0
10

शालेय स्तरावरून २२ मुला-मुलींच्या संघांनी घेतला सहभाग

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा व बेसबॉल संघटना बुलढाणा आणि यशोधाम पब्लिक स्कुल अँड ज्यु. कॉलेज, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा नुकत्याच यशोधाम पब्लिक स्कुल अँड ज्यु.कॉलेज येथे उत्साहात पार पडल्या. बेसबॉल क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय स्तरावरून २२ मुला-मुलींच्या संघांचा सहभाग होता. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उषा होत्या. कार्यक्रमाचे उद्‌घाटक रमेश उमाळकर, बाळासाहेब जगताप होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे रवींद्र धारपवार, विजय पळसकर, तर उद्‌घाटनप्रसंगी पत्रकार धीरज वैष्णव, संदीप सावजी, कृष्णा मेहसरे, सतीश दांडगे, जमील भाई, समाधान सुरवाडे उपस्थित होते. स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील विविध शाळेचे संघ उपस्थित होते. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

क्रीडा स्पर्धेसाठी तर मुलांचा १९ वर्षाखालील अंतिम सामना यशोधाम पब्लिक स्कुल, मलकापूर विरुद्ध अजित इंटरनॅशनल स्कुल, नांदुरा यांच्यात पार पडला. त्यात यशोधाम स्कुलच्या खेळाडूंनी ५-० या फरकाने अजित इंटरनॅशनल स्कुलला पराभूत केले. त्यामुळे तो संघ शालेय विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तसेच मुलींच्या १९ वर्षाखालील अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा व जु.कॉलेज चांदई यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. यशोधाम पब्लिक स्कुलला द्वितीय क्रमांकवर समाधान मानावे लागले. मुलांच्या आणि मुलींच्या १४ वर्षातील वयोगटात अंतिम सामना यशोधाम पब्लिक स्कुलविरुद्ध स्कुल ऑफ स्कॉलर यांच्यात पार पडला. १७ वर्ष आतील मुलांचा आणि मुलींचा अंतिम सामना यशोधाम पब्लिक स्कुल, मलकापूर विरुद्ध स्कुल ऑफ स्कॉलर, मलकापूर यांच्यात पार पडला.

पंच म्हणून यांनी पार पाडली जबाबदारी

स्पर्धेत पंच म्हणून प्रफुल्ल वानखेडे, स्वप्निल साळुंखे, प्रणव देंडव, भूषण गारमोडे, स्वप्निल मिरगे, आकाश लटके, शेख निसार, संकेत मोरे, जयेश दैवे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी यशोधाम पब्लिक स्कुलचे संचालक डॉ.वैभवजी महाजन यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी धीरज चवरे, संदीप मुंडे, प्रफुल्ल वानखेडे (विभाग प्रमुख), प्रफुल्ल इंगळे, विनायक क्षीरसागर, धनश्री आगलावे तसेच इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांंनी परिश्रम घेतले. सर्वांनी विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले. स्पर्धेत विविध शाळेतील क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी, पालक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रफुल्ल वानखेडे तर आभार प्रफुल्ल इंगळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here