साईमत लाईव्ह धानोरा ता. चोपडा : वार्ताहर
महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र अशा गड किल्ल्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील दुर्ग या प्रकारातील गड किल्यांपैकी एक असलेल्या चोपडा तालुक्यातील चौगाव येथील सुमारे सत्तावीस एकर मध्ये विस्तारलेला व साडे सहाशे मीटर उंच अशा विजयगडावर दर वर्षाप्रमाणे यावर्षीही 16 रविवारी सकाळी दहा वाजता गड पुजनाचा कार्यक्रम राजा शिवछत्रपती परीवाराचे विभागीय अध्यक्ष डॉ.संतोष पाटील,ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.पंकज शिंदे ,खान्देश एक्सप्लोर टिमचे सदस्य प्रा.संजय बारी ,पिपल्स बँकेचे अडावद शाखेचे शाखा प्रमुख गुजराथी ,शिवशंभू प्रतिष्ठाने जिल्हाध्यक्ष विश्राम तेले,अक्षय महा ई मेल सेवा केंद्राचे संचालक विशाल पाटील व वन्यजीव संस्थाचे सदस्य सर्पमित्र कुशल अग्रवाल यांच्या हस्ते झाला.
विजयगडावरील सभा मंडपाच्या भिंतींचा काही भाग कोसळण्याच्या परीस्थीतीत असून लोक प्रतिनीधी,शासन व प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष न दिल्यास महाराष्ट्रातील वैभव असलेल्या गड कोटांपैकी अजून एक ऐतिहासिक वारसा नष्ट होईल, अशी भीती या प्रसंगी व्यक्त केली गेली.तसेच विजयगड हा ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व विद्यमान आ. लता सोनवणे तसेच यावल वन विभाग व महसुल विभाग प्रयत्नशील असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.
या प्रसंगी श्रीक्षेत्र त्रिवेणी मंदिर परिसरात पर्यटकांना बसण्यासाठी काही दानशूरांनी सिमेंट आसन दिले होते ते बसवण्यात आले.यात कैलास बाजीराव पाटील चौगावकर सहा.अधिक्षक जिल्हा व सत्र न्यायालय जळगाव यांनी एक,चौगाव ग्राम पंचायतीचे सदस्य गोपाल देविदास पाटील यांनी तीन ,दोन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुप्तदान, असे सहा सिमेंट आसन दिले होते ते बसवण्यात
आले.