साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील सप्तशृंगी कॉलनी, ओम दुर्गेश्वर महादेव मंदिर येथे बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर सम्राट बळीराजा महोत्सवास ना.अनिल पाटील यांनी उपस्थित राहून सम्राट बळीराजाचे पूजन केले. बलिप्रतिपदेच्या दिवशी ईडा, पीडा टाळून बळीराजाचे राज्य आणण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जय अंबे मित्र मंडळ व तरुण कुढापा मित्र परिवाराने प्रबोधनात्मक, वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सम्राट बळीराजा लोकोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.