जामनेरात जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा

0
38

मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

शहरातील वाकी रस्त्यालगतच्या बेस्ट बाजाराच्या आवारात फोटोग्राफर मित्र मंडळाच्यावतीने सोमवारी, १९ रोजी जागतिक फोटोग्राफर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर अरुण रत्नपारखे, प्रशांत बेलपत्रे, मनोज दुसाने, शशी पाटील, आबा पाटील, सुपडू जाधव, प्रल्हाद सावडकर, प्रवीण गावंडे, प्रभु झाल्टे, विनोद नाईक, सचिन तायडे, संदीप पाटील, पवन सावडकर, गोपाल माळी, गणेश सातवे, अमोल मराठे, वैभव पाटील, किरण पाटील, नीरज चौधरी, राहुल इंगळे, पवन भोई, अनिकेत सिसोदे, पवन चोपडे, कुंदन साळुंखे, कुणाल पाटील, गोपाल माळी, दिलीप साळुंके, हर्षल जैन, राहुल बाविस्कर, राहुल भोईटे, पिंगला भोई, दिलीप साळुंखे यांच्यासह असंख्य फोटोग्राफर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here