चाळीसगाव महाविद्यालयात ‘एका प्लाास्टिकची दुसरी गोष्ट’वर कार्यशाळा

0
14

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि देवरे फाउंडेशनतर्फे आयोजित ‘एका प्लाास्टिकची दुसरी गोष्ट’ प्लास्टिकपासून होणाऱ्या परिणामावर हिरापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महाविद्यालयात नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.आर.जाधव होते. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. संगीता चव्हाण यांनी केले.

कार्यशाळेसाठी पुणे, मुंबई येथून ग्रीन वर्क ट्रस्टच्या मार्गदर्शिका गार्गी गीध, रुपाली नाईक यांनी प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणाम, प्लास्टिकचे वीस वर्षापासून ते चारशे वर्षांपासूनचे आयुष्य व प्लास्टिकचे पार्टीकल तयार होऊन ते डम्पिंग स्टेशन, नाले, गटारी, समुद्र व समुद्रातून मासे व आपल्या अन्नसाखळीत शिरून ते माणसाच्या शरीरापर्यंत पोहोचून रक्तात प्रवेश केला आहे. प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कुतुबमिनारपेक्षा उंच असलेले डम्पिंग स्टेशन भारतात निर्माण झाले आहेत. आगामी काळात एक जटिल समस्या मानव जातीवर हल्ला करीत आहे. आपण त्याचा वेळीच उपाय करावा, त्याविषयी उपाययोजना दोघे मार्गदर्शकांनी सविस्तर सांगितल्या. तरुण हे उद्याचे भविष्य आहेत. माहितीचा नक्कीच फायदा घेऊन आपले गाव, शहर व देश सुंदर करून मानव जातीला प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त करू या, अशी संकल्पना मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी रोटरी आणि देवरे फाउंडेशनने घेतलेल्या कार्यक्रमाचे नक्कीच महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतील, अशी आशा व्यक्त केली.

प्रकल्पाची संकल्पना प्रकल्प मार्गदर्शक डॉ. उज्ज्वला देवरे यांनी मांडली. कार्यक्रमाला बलदेव पूंशी, राजेंद्र कटारिया, सोपान चौधरी, सरोज जाधव, सरला साळुंखे, डॉ. रवींद्र निकम, उपप्राचार्य श्रीमती मगर यांच्यासह राष्ट्रीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष ब्रिजेश(भैय्या) पाटील, सूत्रसंचालन प्रा. निकम तर प्रकल्प प्रमुख अनिल मालपुरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here