साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
रावेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लक्षात घेता यावल तालुक्यात काँग्रेसला अंजाळे गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खिंडार पडले असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
तालुक्यातील भालोद येथे यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात भारतीय जनता पार्टी तर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा व रणनीती आखण्यासाठी बैठक घेण्यात आली.मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत अंजाळे तालुका यावल येथील ग्रामपंचायत उपसरपंच व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दीपक नरोत्तम चौधरी तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य शुभम पंडित चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे,अमोल जावळे,यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे आदींनी केला हे कार्यकर्ते बाजार समिती मतदार संघातील असल्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पारडे जड होण्याबाबतचे शुभ संकेत निर्माण झाले.
याप्रसंगी अमोल जावळे हिरालाल चौधरी,शरददादा महाजन, नरेंद्र नारखेडे आदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामाभोळे यांनी सुद्धा त्यांना एक संघ होऊन काम करा व पंधरा वर्षे आपल्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती परत पूर्ण बहुमताने जिंकून आणा असे सांगितले कार्यक्रमाला अमोल हरिभाऊ जावळे,शरददादा महाजन, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉ.कुंदन फेगेडे,नारायण चौधरी,भरत महाजन,उज्जैन सिंग राजपूत,नरेंद्र विष्णू नारखेडे,योगेश भंगाळे, यावल तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी चौधरी,कांचन पालक,हर्षल पाटील, हिरालाल चौधरी,माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.सविता भालेराव, फैजपूर येथील पांडुरंग दगडू सराफ,जळगाव जिल्हा संचालक नितीन नारायण चौधरी,नरेंद्र कोल्हे,पुरुजित चौधरी,हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले.