परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रेत महिलांच्या दांडियाने वेधले लक्ष

0
80

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम जयंतीनिमित शुक्रवारी, १० मे रोजी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत प्रथमच महिलांनी दांडिया खेळल्याने त्यांनी लक्ष वेधून घेतले होते. ‘जय परशुराम बोलो जय परशुराम’ गाण्याच्या तालावर महिलांची पावले दांडियात थिरकली. तसेच चित्तथरारक प्रात्यक्षिक पूजा दायमा, नंदिता जोशीने ढाल तलवार बाजीने प्रेक्षकांचे मने जिंकुन लक्ष वेधून टाळ्या मिळविल्या.

बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नितीन पारगावकर, महिला अध्यक्ष वृंदा भालेराव, सुधा खटोड, छाया त्रिपाठी, श्रीकांत खटोड यांच्या उपस्थितीत सुभाष चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी नंदिता जोशीने डोक्यावर कळसी ठेवून फायर नृत्य केला.

दांडियात प्रियंका त्रिपाठी, अनुराधा दायमा, पूजा दायमा, नंदिता जोशी, मंगला दायमा, राजेश्री पारेख, सपना शर्मा, कोयल पुरोहित, प्रिया ओझा, लक्ष्मी शुक्ला, ऐश्‍वर्या नागोरी, माधुरी सारस्वत, स्मिता पंडित, बबिता उपाध्याय, ज्योती पुरोहित, मंजु पुरोहित यांनी सहभाग घेतला होता. नरेश बागडे यांनी दांडियाचे प्रशिक्षण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here