साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स अँड के. के.सी.कॉमर्स कॉलेजमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती, युवती सभा आणि कायदेशीर जागरूकता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उद्घाटक आणि प्रमुख वक्त्या म्हणून योगाचार्य सीमा शर्मा यांना आमंत्रित केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अजय काटे उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा.डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. कला खापर्डे, अंतर्गत तक्रार निवारण समिती प्रमुख डॉ. नयना पाटील, कायदेशीर जागरूकता समिती प्रमुख प्रा. वैशाली पाटील, सर्व समिती सदस्य, महाविद्यालयातील इतर प्राध्यापिका, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी योगाचार्या सीमा शर्मा यांनी काही महत्त्वपूर्ण योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच युवतीकडून योगाभ्यास करून योगाचे धडे दिले. उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समितीसारखे अनेक उपक्रम राबविले जातात त्याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपप्राचार्या डॉ.खापर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाला शिक्षकेतर कर्मचारी रघुनाथ खलाल, पृथ्वी पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. नयना पाटील यांनी करून दिला. प्रास्ताविकात प्रा. वैशाली पाटील यांनी कार्यक्रमाचे औचित्य साधत महिला दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थिनींना आपल्या हक्कांसोबतच कर्तव्याची जाणीव करून दिली. सूत्रसंचालन डॉ. पूनम निकम तर डॉ. दीपाली बनस्वाल यांनी आभार मानले.