साईमत जळगाव प्रतिनिधी
महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी उद्योग महत्वाचा असून महिलानी स्वत: सक्षम होऊन मोठे उद्योजक व्हावे असे आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी आवाहन महिलाना केले. महिलाना उद्योग उभारण्यासाठी बँकानी आर्थिक मदत करावी तसेच महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची बाजार पेठ निर्माण व्हावी असेही त्या म्हणाल्या.
महानगरपालिकेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलता होत्या.
प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अति आयुक्त पल्लवी भागवत , उपायुक्त निर्मला गायकवाड , सहाय्यक आयुक्त गणेश चाटे , सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड , शहर अभियान व्यवस्थापक शालिग्राम लहासे, मानसी भापकर, गायत्री पाटील आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत ४ ते ६ मार्च दरम्यान उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचा लाभ सुमारे ८० लाभयार्थ्यानी घेतला. लाभयार्थ्याना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्वय-रोजगार घटकाच्या मार्फत ज्या लाभयार्थ्याना बँके कडून कर्ज प्राप्त झालेले आहे. अश्या लाभयार्थ्याना उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत उद्योग व्यवसाया विषयी तज्ञ प्रशिक्षक दिलीप ठाकूर यांनी प्रशिक्षण दिले.
यशस्वीतेसाठी दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी अमोल भालेराव, राहुल बडगुजर , आशा चौधरी, कविता पाटील, शितल कंखरे, अब्बास तडवी, राजेश गडकर, नितीन जोशी, कैलास पंधारे व नरेश भोसले यांनी परीश्रम घेतले. आभार शहर अभियान व्यवस्थापक शालिग्राम लहासे यांनी व्यक्त केले.