Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये – जयश्री पोफळे
    जळगाव

    समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये – जयश्री पोफळे

    saimatBy saimatSeptember 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    इनरव्हील क्लब जळगावच्या महिलांना मार्गदर्शन,एचआयव्हीग्रस्त महिलेला शिलाई मशिन वाटप, मुकबधिर मुलीला शिष्यवृत्ति

    साईमत/जळगाव /प्रतिनिधी :

    महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. घर, परिवार आणि सामाजिक स्तरावर सकारात्मकरित्या पुढे येऊन सर्व विचारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्या विचारांतून दीन, दुबळ्यांसह गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम इनरव्हीलच्या माध्यमातून करता येत आहे, त्यासाठी जळगाव इनरव्हील क्लबच्या माध्यमातून उषा जैन व टिम प्रयत्न करत असल्याचा आनंद आहे. सध्या समाजात अस्वस्थता असून सामाजिकस्तरावर अस्वस्थता आहे. ही भरकटेलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये आहे. इनरव्हिल क्लबच्या विशिष्ट प्रक्रियेतून विधायक कार्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा व आपल्या संस्कृतीचे संवर्धन करावे असे आवाहन डिस्ट्रीक चेअरमन जयश्री पोफळे यांनी केले.

    रोटरी क्लबच्या गणपती नगर येथील हॉलमध्ये झालेल्या ऑफीशल चेअरमन व्हिजीटप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर डिस्ट्रीक्ट ट्रेजरर प्रिती दोशी, जळगाव इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, ट्रेझरर गुंजन कांकरिया, पीडीसी नुतन कुंक्कड, पीएटी मिनील लाठी, सीसी रंजन शहा उपस्थित होते.
    दीपप्रज्ज्वलनाद्वारे कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. मयुरी पवार यांनी भगवती स्तुती म्हटली. अर्चना लोंढे यांनी कुण्या गावाचं आलं पाखरु.. या गीतावर वेलकम डान्स  सादर केला. साधना महाजन यांनी परिचय करुन दिला. गुंजन कांकरिया यांनी हिशोबाचा लेखाजोखा मांडला.

    निशीता रंगलानी यांनी इनरव्हील क्लब ने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष उषा जैन यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा सांगत भविष्यातील प्रोजेक्ट विषयी क्लबमधील महिला सदस्यांना माहिती दिली. महिला सुरक्षेतेसह, सायबर क्राईम, सोशल माध्यामांसह मोबाईल टिव्हीचा वाढलेला अतिरेक वापर, यामुळे महिलांसह मुलांच्या मानसिक संतुलनावर होणार परिणाम, गुड टच ब्याड टच याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

    पदवी ला असलेल्या मुकबधिर मुलीला विशेष शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच एचआयव्हीग्रस्त महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने शिलाई मशिनचेही वाटप करण्यात आले. डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरवर चोरी

    January 21, 2026

    जळगावमध्ये “सकल लेवा पाटीदार युवती व महिला अधिवेशन” होणार; समाजाच्या नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध

    January 21, 2026

    Parola : वारसा हक्क डावलून आई-विरुद्ध सख्ख्या भावांनी मालमत्ता बळकावली

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.